पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे उपस्थितीत मारूती आबा बनकर यांचा भाजप मध्ये जाहीर पक्षप्रवेश
बाबासाहेब आणि दीपक आबा यांच्याबरोबर सांगोला तालुक्याचा विकास करणार - पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे उपस्थितीत मारूती आबा बनकर यांचा भाजप मध्ये जाहीर पक्षप्रवेश
बाबासाहेब आणि दीपक आबा यांच्याबरोबर सांगोला तालुक्याचा विकास करणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सांगोला (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात खूप मोठ्या ताकतीने विकासाची कामे सुरू आहेत. सांगोला तालुक्याच्या विकासाचा संकल्प घेऊन आपण पुढे जात आहोत. सांगोला तालुक्यात भाजप खूप ताकतीने काम करत आहेत. भाजपच्या विचारधारेसोबत अनेक विचार जोडत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे आम्ही सगळे मिळून सांगोला तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करू. सांगोला तालुक्याच्या विकासासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचा संकल्प करुन आम्ही काम करतोय, या पुढील काळात मी खंबीरपणे सर्वांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार असल्याचे पालक मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सांगितले.सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी सांगोल्यात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, दिपकआबा व आ. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सोबत घेऊन निवडणूकीस सामोरे जाण्याचा विचार करतोय. पुढचे सर्व निर्णय तिघेजण बसून घेतील आणि निर्णय जाहीर करतील असे त्यांनी सांगितले.
शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष मारुती आबा यांनी काल सोमवार दि.१७ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत औपचारिकरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, दीपक आबा साळुंखे पाटील बाळासाहेब एरंडे, डॉ प्रभाकर माळी,माजी सभापती बाळासाहेब काटकर, अॅड. सचिन देशमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे सांगोला तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार आहे. सांगोल्याचा ऐतिहासिक वारसा मोठा आहे. या तालुक्यात आदरणीय गणपतराव देशमुख यांच्या विचाराने बाढलेले कार्यकर्ते या तालुक्यात आहे. कधी कधी सामंजशाची भूमिका घ्यावी लागते. आणि ती भूमिका घेत असताना सांगोला तालुक्यासारखे पोलाईट नेते मी कधी बघितलेले नाहीत, त्याग करण्याची भूमिका या सांगोला तालुक्यामध्ये खूप आहे हे आमच्या किंवा इतर तालुक्यांमध्ये घडत नाही. माजी नगराध्यक्ष मारुती आबा यांचा भाजप पक्ष मध्ये प्रवेश झालाय असे मी सांगतो. मारुती आबाची प्रतिष्ठा खूप आहे, अनेक दिवसापासून स्व. आबासाहेब यांचे सोबत काम केले आहे, असा नेता भाजपसोबत आला आहे याचा मला मनस्वी आनंद होत असून त्यांचे मी स्वागत करतो. सांगोला तालुक्याला ऐतिहासिक वारसा आहे निवडणुकीमध्ये सर्वजण एकमेकांच्या विरोधात आणि लढाई करतात. परंतु निवडणूक झाल्यानंतर तालुक्याचा विकासाचा विचाराचा, विषय जेव्हा येतो तेव्हा सर्व नेते सोबत येतात हे विशेष आहे.
माजी नगराध्यक्ष श्री. मारुती आबा बनकर हे सांगोल्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेला दांडगा संपर्क, शांत स्वभाव आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. अचानक त्यांनी भाजपची वाट धरत आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय पाऊल उचलले आहे.



