आषाढी आणि कार्तिकी वारी ही वारकऱ्यांसाठी खरी दिवाळी,शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊदेत म्हणून पांडुरंगाला साकडं- एकनाथ शिंदे

आषाढी आणि कार्तिकी वारी ही वारकऱ्यांसाठी खरी दिवाळी,
शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊदेत म्हणून पांडुरंगाला साकडं- एकनाथ शिंदे
पंढरपूर प्रतिनिधी
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक आज विठुरायाची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी दर्शन रांगेतील पहिले मानाचा वारकरी दांपत्य उपमुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेमध्ये सहभागी झाले होते. नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावाचे रामराव वालेगावकर आणि सौ.सुशिलाबाई वालेगावकर हे कार्तिकी एकादशीनिमित्त मानाचे वारकरी ठरले. मागील 20 वर्षांपासून ते वारी करतायत, मंदिर समितीच्या वतीने शिंदेंच्या हस्ते तुळशीची माळ घालून त्यांचा सत्कार करण्यात आलाय. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे देखील पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित होते. तर मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोरे देखील यावेळी उपस्थित होते. तर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेचे दोन शाळकरी मुलं पुजेत सहभागी झाले होते.
आषाढी व कार्तिकी महापूजा सामील झालेले मानाचे वारकरी दाम्पत्यांना एक वर्षाचा नाही तर कायमस्वरूपी एसटीचा मोफत देण्याचा प्रयत्न करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. विठ्ठल मंदिर आणि परिसरात एक वेगळी ऊर्जा आहे. चौथ्यांदा महापूजेस म्हणून मिळाला. खूप भाग्यवान समजतो. इथे फक्त vip वारकरी आहेत. शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री…ही सगळी पदे विठ्ठलांमुळे मिळाली, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सलग 7 महिने पाऊस पडतो आहे. बळीराजा वरचे सर्व संकटे दूर कर…त्याच्या जीवना सुखाचे आनंदाचे दिवस येऊ दे..संपूर्ण महाराष्ट्र हाच आमचा परिवार…सर्वांना चांगली सुखासमृद्धीचे दिवस येऊ दे हा आमचा अजेंडा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. Mtdc जागा 30 वर्षे मंदिराला देणार तर चंद्रभागा प्रदूषण मुक्त करणार, असं आश्वासन देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी दिले.
आषाढी आणि कार्तिकी वारी ही वारकऱ्यांसाठी खरी दिवाळी असते, त्यामुळे हा दिवस अनुपम्य सोहळा ठरवा यासाठी स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, चंद्रभागेच्या तीरावर अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान उच्च दर्जाचे मानून काम करणारा मी कार्यकर्ता असल्याचे याप्रसंगी आवर्जून नमूद केले. तसेच वारकरी हे शेतकरीच असतात, सध्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असून त्यासाठी राज्य शासनाने 32 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यामुळे आज बळीराजावरील सर्व दुःख, संकटे दूर कर एवढेच मागणे मागण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी आलो असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

