खेळलेख

जेमिमाह रॉड्रिग्स : आत्मविश्वास, प्रतिभा आणि नव्या भारतातील स्त्रीशक्तीचं प्रतीक

जेमिमाह रॉड्रिग्स : आत्मविश्वास, प्रतिभा आणि नव्या भारतातील स्त्रीशक्तीचं प्रतीक

 

(प्रवीण बागड़े,नागपूर)

जेमिमाह रॉड्रिग्स हे भारताच्या महिला क्रिकेट संघातील एक चमकदार आणि आशादायी खेळाडू आहे. ५ सप्टेंबर २००० ला मुंबई येथे जन्मलेल्या जेमिमाहने कमी वयातच क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलणाऱ्या नव्या पिढीत एक नाव तेजाने झळकतं ते जेमिमाह रॉड्रिग्स. तिच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक चौकार केवळ धावसंख्या वाढवत नाही, तर तो प्रत्येक भारतीय मुलीच्या मनात उमटणाऱ्या “मीही करू शकते” या विश्वासाचा स्वर आहे.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जन्मलेली मुंबईच्या भांडूप भागात वाढल्या, सामान्य कुटुंबातून आलेली जेमिमाहच्या कुटुंबाने नंतर बॅंड्रा वेस्टमध्ये स्थलांतर केले, कारण तिथे खेळासाठी उपयुक्त सुविधा अधिक होत्या. तिच्या वडिलांनी स्वतः शाळेत मुलींसाठी क्रिकेट टीम तयार केली. कारण त्यांना आपल्या मुलीला संधी हवी होती. हीच होती त्या लहानशा स्वप्नाची पहिली पायरी. मैदानावर बॅट हातात घेताना तिच्या डोळ्यांत धडाडी होती, पण चेहऱ्यावर नम्रता होती, हाच तिच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा. क्रिकेट व्यतिरिक्त तिला हॉकीमध्येही रुची होती आणि तिने महाराष्ट्रातील U17 हॉकी संघातही भाग घेतला होता. जेमिमाहने केवळ वयाच्या १७व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केलं. त्या वयात जिथे अनेक जण अजून दिशा शोधत असतात, तिथे तिने देशाचं प्रतिनिधित्व केलं. तिच्या फलंदाजीमध्ये आक्रमकता आहे, पण त्याचवेळी ती तर्कशुद्ध आहे. तिचा टायमिंग, कव्हर ड्राइव्ह आणि स्मार्ट रोटेशन ऑफ स्ट्राइक हे आजच्या जागतिक दर्जाच्या महिला क्रिकेटमध्ये उदाहरण ठरत आहेत.
 जेमिमाह ने २०१८ साली T20 आणि ODI कार्यक्षमतेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. उजव्या हाताने फलंदाजी करणारी आणि अफ-ब्रेक गोलंदाजीही थोडी केली आहे. तिने अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत. उदाहरणार्थ २०१७ साली ५० ओव्हर खेळात महिला क्रिकेटमध्ये दुय्यम महिलेत दोनशे रन गाठणारी खेळाडू होती. तसेच २०१९ साली Women’s T20 Challenge मध्ये त्यांनी ‘सुपरनोव्हास’ संघासाठी सर्वाधिक रन्स केल्या आणि ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ बनल्या. तिच्या कामगिरीमुळे भारतीय महिला क्रिकेटला नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे. तिची फलंदाजी केवळ धावा मिळवण्यापुरती नाही, तर संघाच्या विजयासाठी निर्णायक ठरतेय. जेमिमाह आपल्या कौशल्याने तसेच मैदानाबाहेरही एक प्रेरणा बनली आहे. ती तरुण खेळाडूंसाठी “मी ही करू शकतो” अशी भावना जागृत करते. मोठ्या दडपणाखाली खेळणे, सार्वजनिक अपेक्षा आणि झपाट्याने बदलणाऱ्या ग्लोबल क्रिकेट स्पर्धांमध्ये टिकणे. हे सर्व जेमिमाहसारख्या तरुण खेळाडूंसमोर मोठे आव्हान आहे. तथापि, त्यांच्या विकासाची गती आणि तिच्या कामगिरीतील सातत्य पाहता, भविष्यात अजून मोठी कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
पण हा प्रवास इतकाच गोड नव्हता. कधी संघातून बाहेर पडणं, कधी खराब फॉर्म, तर कधी सोशल मीडियावरील टीका, हे सर्व तिने सामोरं घेतलं. मात्र प्रत्येक वेळी ती परत आली अधिक परिपक्व, अधिक ठाम. भारतीय महिला क्रिकेट आता फक्त ‘पुरुष क्रिकेटची सावली’ राहिलेलं नाही. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांसारख्या खेळाडूंनी या क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे. जेमिमाह केवळ खेळत नाही, ती प्रतिनिधित्व करते. त्या सर्व मुलींचं, ज्यांनी समाजाच्या संकुचित चौकटी मोडून आपलं स्वप्न निवडलं. ती केवळ खेळाडू नाही, तर एक सच्ची प्रेरणा आहे. तिच्या हसण्यात आत्मविश्वास आहे, आणि तिच्या वागण्यात साधेपणा. मैदानावर ती जशी झुंजते, तशीच ती जीवनातही आशावादाची झुंज देते. तिचे सोशल मीडियावरील संवाद, संगीताची आवड, आणि धर्मावरील विश्वास. हे सर्व तिच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवतात.
काल तिचा एकेक चौकार तिला ट्रोल करणार्‍या भक्तडुक्कर पिलावळीच्या सणसणीत मुस्काडात लगावल्यासारखा बसत होता. तिला जवळजवळ आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला होता हराम्यांनी. दुसर्‍याचं करीयर बरबाद होण्यात आनंद मानणं हे त्यांच्या पिढीजात नासक्या रक्तातच आहे.
         काही महिन्यांपूर्वी जेमिमाच्या वडिलांवर बेसलेस खोटे आरोप करून या पिलावळीनं तिचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द करायला लावलं. ‘ती ख्रिश्चन आहे’ हा जणू तिचा दोष आहे, अशी वागणूक तिला दिली गेली. तिचं करियर संपवण्याचा घाट घातला. या नालायक जमातीच्या जिवघेण्या ट्रोलींगनं ती खचली. ‘गँगरेप’सारख्या धमक्यांनी ती डिप्रेशनमध्ये गेली. तिनं क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. तिचे कुटूंबीय आणि कोच तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. मानसोपचार तज्ञाची मदत घेऊन तिला पुन्हा उभं केलं. काल तिनं अक्षरश: डोळे दिपवणारा खेळ करून आपल्या देशाला वर्ल्डकप फायनलची जवळजवळ बंद झालेली दारं उघडी करून दिली ! सेमीफायनलला ३३८ धावांचा डोंगर पार करणं खायचं काम नव्हतं. जेमिमानं नाबाद शतक करून सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला लांब फेकून दिलं… त्याचबरोबर भक्ताडांच्या ट्रोलिंगलाही सातासमूद्रापल्याड भिरकावून दिलं ! तिची ही खेळी पुरूष आणि स्त्रियांच्या वर्ल्ड कप नॉकआऊट फेरीमधली आजवरची रेकॉर्ड ब्रेक खेळी ठरली आहे. एवढंच नाही, तर जगभरातल्या महिला क्रिकेटसाठी ही ऐतिहासिक खेळी आहे.
जेमिमाह हे केवळ एक उत्तम फलंदाज नाही, तर आधुनिक महिला क्रिकेटमध्ये बदल घडवू शकणाऱ्या व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहेत. तसेच जेमिमाह ही केवळ एक क्रिकेटपटू नाही; तर ती नव्या भारतातील स्त्रीशक्तीचं जिवंत प्रतीक आहे. तिची कहाणी दाखवते की कसोटी, मेहनत, आणि आत्मविश्वास यांचं संगम कसा महान क्षात्रांसाठी मार्ग खुलवतो. पुढच्या काळात त्यांनी खेळाच्या प्रत्येक अंगावर आपली छाप सोडावी, अशी आशा बाळगावी. तिच्या बॅटमधून निघणाऱ्या प्रत्येक धावेसोबत भारतातील हजारो तरुणींना दिशा मिळते, आत्मविश्वास मिळतो, आणि समाजाला एक नवीन संदेश मिळतो. “संधी दिली, तर मुलीही इतिहास घडवू शकतात.”
जेमिमाह, आज संपुर्ण भारत देशाला आणि प्रत्येक खर्‍याखुर्‍या भारतीयाला तुझा अभिमान आहे. तू आमच्या देशाची शान आहेस. आमचा देश प्रत्येक देशवासियाच्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, वंशाचा आदर करणारा आहे. संविधानानं दिलेली समता आणि बंधुता जपणारा आहे. धर्माचा आणि देशाचा ठेका घेऊन जबरदस्ती करू पहाणार्‍या भिकारड्यांना तू आज खर्‍या अर्थानं दाखवून दिलंस की,”किसी के बाप का हिंदोस्तान थोडी ही है?”

जय हिंद !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button