प्रभाग क्रमांक ३ मधून उच्चशिक्षित डॉ. वैभव जांगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार

प्रभाग क्रमांक ३ मधून उच्चशिक्षित डॉ. वैभव जांगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहराला आधुनिकतेची नवी ओळख मिळवून देण्याचे ध्येय ठेवत प्रभाग क्रमांक ३ मधून उच्चशिक्षित व बहुआयामी कार्यकर्ते डॉ. वैभव जांगळे यांनी आज दिमाखात उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभागाचा सर्वांगीण विकास, नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा आणि प्रभागातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण उत्थान हा आपल्या निवडणुकीचा मुख्य आधार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकरी बांधव, व्यापारी, कष्टकरी, युवक–मुलींना रोजगाराभिमुख वातावरण, तसेच महिलांसाठी सुरक्षित व सुविधा-संपन्न परिसर निर्माण करणे ही आपली प्राथमिकता असेल, असे डॉ. जांगळे यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कायदेशीर जाण असलेले वकील, संपादक व पत्रकार अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडत सामाजिक आयामात काम करणाऱ्या डॉ. जांगळे यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये नवीन राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना ते म्हणाले, “प्रभाग क्रमांक ३ चा विकास ही माझी जबाबदारी नाही, तर माझं कर्तव्य आहे. नागरिकांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पाठिंब्यानेच आपण प्रभागाला आदर्श बनवू.”
उमेदवारी अर्ज दाखल करताना समर्थकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत.



