प्रभाग 3 मधील सर्व घरापर्यंत नगरपालिकेचा विकास पोहचवण्याचा डॉ वैभव जांगळे यांचा निर्धार..

प्रभाग 3 मधील सर्व घरापर्यंत नगरपालिकेचा विकास पोहचवण्याचा डॉ वैभव जांगळे यांचा निर्धार..
सांगोला / प्रतिनिधी
सांगोला नगरपरिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा रंग आता चढू लागला असून, विविध प्रभागांमध्ये उमेदवारांच्या प्रचाराची जोरदार धामधूम सुरू आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ३ मधून नगरसेवकपदासाठी मा. डॉ. श्री. वैभव फुलाबाई सुकदेव जांगळे (BAMS, LL.B.) यांनी व
“सांगोला शहरातील सर्वांचा विकास आणि प्रत्येक नागरिकाचा सहभाग”
या दमदार घोषवाक्यासह जनतेसमोर आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
“ध्येय – जनसेवेचं” या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत डॉ.वैभव जांगळे यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर थेट उपाययोजना करणारा आणि विकासाचा आराखडा सादर करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सांगोला शहरात प्रत्येकाला चांगले रस्ते,स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून पारदर्शक, जबाबदार आणि जनतेशी निगडित प्रशासन देण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉ.जांगळे हे शिक्षणाने डॉक्टर असून, डॉक्टर असतानाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी
कायद्याचे शिक्षणही त्यांनी घेतले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि कायदेशीर जाण यांच्या जोरावर नागरिकांच्या हक्कांसाठी लढण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सांगोल्याच्या प्रगतीसाठी त्यांनी दीर्घकाळ काम केले असून, अनेक सामाजिक उपक्रमांमधून ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये त्यांच्या उमेदवारीची चर्चा मोठ्या उत्साहात सुरू असून, आपला माणूस उमेदवार असावा अशी हाक उमटू लागली आहे. डॉ.जांगळे यांचा विश्वास आहे की जनतेचा पाठिंबा, पारदर्शकता आणि सेवाभाव या तीन बळांवर ते सांगोल्याच्या विकासाचे नवीन पर्व सुरू करतील.



