भेदभाव न करता भारतीय म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे- कुमुद भडकवाड
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

भेदभाव न करता भारतीय म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे- कुमुद भडकवाड
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सांगोला: प्रतिनिधी
भारताचे लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. सरदार पटेल यांनी भारताचे एकीकरण करण्याचे महान कार्य केले आहे. त्यांनी ५६२ पेक्षा जास्त संस्थानांना एकत्र आणून आजचा अखंड भारत निर्माण केला. त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि कठोर निर्णयक्षमतेमुळे त्यांना “भारताचे लोहपुरुष” म्हटले जाते. ते म्हणायचे “एकता हीच आपली खरी ताकद आहे. आजच्या काळात ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. आपण धर्म, जात, भाषा किंवा प्रांत या भेदांपलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून विचार केला पाहिजे असे मत कुमुद भडकवाड यांनी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये बोलताना व्यक्त केले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० वी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरूंगले, फार्मसीचे प्राचार्य डाॅ. संजय बैस आदीच्या हस्ते करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
भारत देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दरवर्षी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते. जयंतीचे औचित्य साधून फॅबटेक मध्ये राष्ट्रीय एकदा दिवसाची विद्यार्थिनी मनस्वी देशमुख हिने प्रार्थना घेतली.
यादरम्यान कुमारी प्रणाली पाटील या विद्यार्थिनींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनपट उपस्थितांसमोर माडून एकता हिच खरी आपली ताकद असल्याचे मत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. राहुल पाटोळे, ग्रंथपाल सुधीर माळी, मोहन लिगाडे, प्रा. संगिता खंडागळे, स्वप्निल रूपनर, नेताजी मस्के आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अमोल पोरे यांनी केले



