सांगोल्यामध्ये जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन
युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने व स्पोर्ट्स कराटे व डो असोसिएशन सोलापूर यांच्या सहकार्याने

सांगोल्यामध्ये जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन
युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने व स्पोर्ट्स कराटे व डो असोसिएशन सोलापूर यांच्या सहकार्याने
सांगोला प्रतिनिधी
सांगोला येथे दिनांक 5 व 6 ऑक्टोबर रोजी शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन होत आहे ही स्पर्धा बंधन पॅलेस सांगोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळेतील कराटे स्पर्धक येणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आ. डॉ. बाबासाहेब देशमुख व प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव व तालुका क्रीडा अधिकारी दत्तात्रेय वरकड यांच्या उपस्थितीत होणार आहे या स्पर्धा दोन दिवस चालणार आहेत.या स्पर्धा वय वर्षे 14, 17, 19 असे विविध वजनी गटाप्रमाणे होणार आहेत.
त्याच बरोबर दिनांक 5 ऑक्टोंबर 2025 रोजी सर्व गट मुले व 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व गट मुली यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मुलीच्या कराटे स्पर्धेची सुरवात सांगोल्याचे पोलीस निरीक्षक घुगे साहेब व माजी उपनगराध्यक्ष चेतन सिंह उर्फ बाळसाहेब केदार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या स्पर्धा राष्ट्रीय अ श्रेणी पंचांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच निजेन्द्र चौधरी ,श्रावणी वाघमारे, सुनील वाघमारे , विशेष सहकारी मयंक स्वामी ,आशिष कोकरे ,राजनंदिनी वाघ, सुभिक्षा इंगोले, मृणाल लांडगे ,सायली गव्हाणे आदींचे सहकार्य लाभणार आहे अशी माहिती कराटे डो असोसिएशन सोलापूर जिल्ह्याचे व सांगोला तालुक्याचे अध्यक्ष श्री जी के वाघमारे सरांनी दिली.



