
सिंहगड पब्लिक स्कूल रोलबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत झळाळती कामगिरी
अंडर-१७ मुलींचा संघ प्रथम, मुलांचा संघ द्वितीय; विभागीय स्पर्धांसाठी पात्रता
सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, केगाव (सोलापूर) येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा मान उंचावली आहे.
या स्पर्धेत अंडर-१७ मुलींच्या संघाने उत्कृष्ट संघभावना, शिस्त आणि दमदार खेळाच्या जोरावर पहिला क्रमांक पटकावला, तर अंडर-१७ मुलांच्या संघानेही दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानत शाळेला गौरव मिळवून दिला. मुलींच्या संघाने यशस्वीरीत्या विभागीय स्तरावरील स्पर्धांसाठी पात्रता मिळवली असून, त्यांच्या पुढील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हटले की, “विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत, शिस्त आणि संघभावना प्रशंसनीय आहे. सिंहगड समूह नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देतो.”
शाळेच्या मुख्याध्यापिका शाहीन शेख आणि उपमुख्याध्यापक प्रकाश नवले यांनी खेळाडूंच्या समर्पणाचे आणि चिकाटीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी खेळात दाखवलेली ऊर्जा आणि आत्मविश्वास इतरांसाठी प्रेरणादायी आहे. या संघांच्या यशात प्रशिक्षक स्वप्नजा अराध्ये यांचे विशेष योगदान असून, त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन देत त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला.
या यशामुळे संपूर्ण शाळा परिवार आनंदित असून, विद्यार्थ्यांच्या या विजयाने केवळ क्रीडा कौशल्याचेच नव्हे तर संस्थेच्या ‘शिक्षणासोबत सर्वांगीण विकास’ या उद्दिष्टाचेही सुंदर दर्शन घडवले आहे.



