राजकीय

चोपडी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध — शाहरुख मुलाणी

चोपडी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध — शाहरुख मुलाणी

चोपडी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध — शाहरुख मुलाणी

चोपडी. (प्रतिनिधी) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य मतदारांच्या गाठीभेटी, चर्चा-विचारविनिमयाचे वातावरण तापले असताना चोपडी जिल्हा परिषद गटात शेकापच्या तरुण, अभ्यासू व जनतेतून घडलेल्या नेतृत्वाची म्हणून ओळख असलेल्या शाहरुख मुलाणी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पक्षात आणि जनतेत निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा उल्लेख करताना शाहरुख मुलाणी म्हणाले, “गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील अनेक मंत्रालयीन कामांसाठी मी प्रत्यक्ष पाठपुरावा करून लोकांची कामे मार्गी लावली. चोपडी गटातील सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढताना मी सदैव समाजात राहिलो आहे. त्यामुळे लोकांच्या इच्छेनुसार आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे निवडणूक लढण्याचा माझा निर्धार अधिक दृढ झाला आहे.”

चोपडी गटात उदनवाडी, राजुरी, अनकढाळ, मानेगाव, हणमंतगाव, पाचेगांव (खु.), निजामपूर, लोणविरे, चोपडी, बलवडी, नाझरे, सोमेवाडी आणि बुद्धेहाळ या गावांचा समावेश असून, या सर्व ठिकाणी मुलाणी यांच्या कार्याचे ठसे उमटले आहेत. तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामस्थांचा उत्साह आणि पक्षातील काही वरिष्ठ नेतेदेखील मुलाणी यांच्या उमेदवारीकडे सकारात्मक नजरेने पाहत असल्याचे समजते.

ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, शिक्षण व रोजगार या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत मुलाणी यांनी शेतकरी आंदोलने, युवकांच्या रोजगार उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. “तरुणाईला रोजगार व दिशा देण्यासाठी आतापर्यंत अनेकांना व्यवसाय उपक्रमासाठी मार्गदर्शन केले, मदत केली. गावागावच्या अडचणीत मी सतत लोकांच्या सोबत उभा राहिलो आहे,” असेही ते या प्रसंगी म्हणाले.

सामाजिक कर्तव्यभावनेतून काम करणारे, सर्वांना जोडून घेण्याची क्षमता आणि संघर्षशील वृत्ती ही मुलाणी यांची ओळख बनली आहे. त्यामुळेच चोपडी गटातील युवक, शेतकरी व नागरिक ‘विकासाची नवी दिशा’ म्हणून शाहरुख मुलाणी यांच्याकडे पाहत आहेत.

“गावोगावच्या विकासासाठी आणि प्रत्येक सामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण वेळ आणि शक्ती दिली जाईल. जनतेचा विश्वास माझी सर्वात मोठी ताकद आहे आणि त्यांना सक्षम नेतृत्व देण्याचे ध्येय माझे आहे,” असा विश्वास व्यक्त करत मुलाणी यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button