फॅबटेक फार्मसी विद्यार्थ्यांचा सायंटिफिक पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत डंका
विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त: प्राचार्य डाॅ. संजय बैस यांची माहिती

फॅबटेक फार्मसी विद्यार्थ्यांचा सायंटिफिक पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत डंका
विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त: प्राचार्य डाॅ. संजय बैस यांची माहिती
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी सांगोला महाविद्यालयातील तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या चार विद्यार्थ्यांनी प्रादेशिक पातळीवरील सायंटिफिक पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करून फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाची मान उंचावली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली.
फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मंजुनाथ गदगे, समर्थ काळे, श्रृती तांबे आणि प्रीती वाघमारे या विद्यार्थ्यांनी प्रादेशिक पातळीवरील सायंटिफिक पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक मंजुनाथ गदगे आणि समर्थ काळे तसेच द्वितीय क्रमांक श्रृती तांबे आणि प्रीती वाघमारे यांनी प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण, संशोधनधारित आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सादर केले होतो.
यशस्वी विद्यार्थ्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ.संजय बैस आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



