सामाजिक

जय भवानी माता नवरात्र मंडळाचा जागर उत्साहात

जय भवानी माता नवरात्र मंडळाचा जागर उत्साहात

जय भवानी माता नवरात्र मंडळाचा जागर उत्साहात

कुरवली ता. इंदापूर येथील जय भवानीमाता नवरात्र उत्सव तरुण मंडळाने नवरात्रोत्सवनिमित्त येडेश्वरी मंदिर श्री क्षेत्र येरमाळा ता. कळंब जि धाराशिव येथून १५० कि.मी अंतरावरून ज्योत आणली. जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ मागील मागील २५ वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा करीत असून मंडळाच्या वतीने या उत्सवा दरम्यान नऊ दिवस देवीचा जागर केला जातो संध्याकाळी गायनाच्या कार्यक्रमाने देवीचे गीत गायले जातात यादरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येते चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा खेळ पैठणीचा संगीत खुर्ची इत्यादी कार्यक्रमाच्या आयोजन केले जाते.नवरात्र उत्सव समिती चे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड,माजी उपसरपंच आंबादास कवळे,सचिन गोरे,नाना गायकवाड,दादा सोनवणे,नाना ऱिटे,राहुल कवळे,पप्पू थोरात,दत्तू सकट,दादा राऊत,गणेश खुसपे,मंगेश गोरे,केतन दणाणे,तुकाराम गायकवाड,संतोष माने,बबन गायकवाड,दिपक चव्हाण,राहुल गायकवाड,योगेश घोडे,पप्पू पोपळभट इ कार्यकर्ते नवरात्र साजरी करतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button