शैक्षणिक

क्रिडा क्षेत्रात फॅबटेक काॅलेजची बाजी: इस्टेट डायरेक्टर डाॅ. संजय आदाटे यांची माहिती

क्रिडा क्षेत्रात फॅबटेक काॅलेजची बाजी: इस्टेट डायरेक्टर डाॅ. संजय आदाटे यांची माहिती

सांगोला: प्रतिनिधी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा झोनल स्तरावरील खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला असुन चालू शैक्षणिक वर्षांत फॅबटेक कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात बाजी मारली असल्याची माहिती  इस्टेट डायरेक्टर डाॅ. संजय आदाटे यांनी दिली.

    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्ञ विद्यापीठ लोणेरे (रायगड) अंतर्गत झोनल स्तरावरील खो-खो स्पर्धा ह्या सोलापूर येथील ए जी पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता.
या स्पर्धेत फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले. खो-खो खेळासाठी क्रीडा शिक्षक प्रा. बिरा वगरे आणि प्रा. मोहन वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. या दरम्यान खो-खो खेळात फॅबटेक इंजिनिअरिंगचा सिद्धार्थ उपासे विद्यार्थ्यांला सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून सन्मानचिन्ह देऊन मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले
यशस्वी विद्यार्थ्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाँ. विद्याराणी क्षीरसागर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button