शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद भाऊ माने व सर्व नगरसेवक पदांच्या उमेदवारांना समस्त मुजावर समाजातर्फे पाठींबा जाहीर.

सांगोला (वार्ताहर)
सांगोला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आनंद भाऊ माने व प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री.आनंद दौंडे व सौ.सना शेख त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवार श्री.नितीन इंगोले, सौ.अनिता केदार व सौ.जाकेरा तांबोळी या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यांना समस्त मुजावर समाजाकडून पाठिंबा जाहीर करून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद भाऊ माने, माजी नगराध्यक्ष रफिक भाई नदाफ, आनंद काका घोंगडे उपस्थित होते.
यावेळी मुजावर समाजाचे अध्यक्ष कय्युम मुजावर सर, रऊफ मुजावर, अकबर मुजावर, वाहेद मुजावर, खलील मुजावर, शाहिद मुजावर, मुन्ना मुजावर, कादर मुजावर, हैदर मुजावर, रशीद मुजावर, यांच्यासह बहुसंख्य मुजावर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते