आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले
आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले
सांगोला प्रतिनिधी
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नियम 260 अन्वये आज सभागृहात शेतकरी, शेती आणि पायाभूत सुविधांच्या तातडीच्या प्रश्नांवर मुद्देसूद भूमिका मांडली.
अतिवृष्टीमुळे विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती, जनावरे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, तसेच मच्छीमारांचे झालेले नुकसान सभागृहाच्या निदर्शनास आणले. सोलापूर परिसरातील सीना नदीच्या पात्रात झालेला बदल ही अतिवृष्टीची गंभीर दखल घेण्यासारखी बाब असल्याचे सांगितले.
या कठीण काळात महाराष्ट्रातील महायुती सरकार आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय घेतले, याबद्दल सभागृहात कृतज्ञता व्यक्त केली. अनेक सामाजिक संस्थांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला, हे विशेष नमूद केले.
🔸 पीकविमा योजनांमधील मोठ्या प्रमाणावर फेटाळले जाणारे दावे — त्याची सखोल शहानिशा करण्याची विनंती केली.
🔸 सेंद्रिय शेतीसाठी राज्य सरकारने आणखी प्रोत्साहन द्यावे, असा आग्रह धरला.
🔸 काही वित्तीय संस्था शेतकऱ्यांना अडचणीत टाकत असल्याचे निदर्शनास आणून शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, अशी मागणी केली.
🔸 केळी आणि मक्याचे कमी झालेले हमीभाव वाढवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
🔸 वैनगंगा–पैनगंगा प्रकल्पाप्रमाणेच माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी मांडलेला कृष्णा–भीमा मराठवाडा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावावा, ही विनंती केली.
🔸 सांगोला–उत्तर भारत शेतीमाल वाहतूक रेल्वेतील विशेष बोगी बंद झाल्याची बाब उपस्थित करून त्या पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
🔸 फलटण–पंढरपूर–लोणंद रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकारने पाठपुरावा वाढवावा, अशी मागणी नोंदवली.
🔸 नद्यांमधील अनियंत्रित वाळू उपशावर नियंत्रणाची आवश्यकता मांडली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल राज्य सरकार आणि मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार व्यक्त केले.



