विजयादशमी;दृष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळालेला विजय.
विजयादशमी;दृष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळालेला विजय.
विजयादशमी;दृष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळालेला विजय.
लंकापती रावन हे महान राजनितिज्ञ व पराक्रमी राजा होते म्हणूनच त्यांना लंकापती रावण संबोधले जायचे.परंतु त्यांच्यात काही दृष्ट व वाईट प्रवृत्ती होत्या.त्यांनी माता सीतेचे हरण करून राक्षसीप्रवृतीचा आगास केला. हा त्यांचा सर्वात मोठा गुन्हा होता आणि यातुनच लंकापती रावण परास्त होण्याला सुरूवात झाली.यानंतर रावणाने पुर्णपणे अधर्माचा मार्ग पत्करला अधर्माचा मार्ग सोडण्यासाठी देवी-देवता, आप्त-नातेवाईक, राजनैतिज्ञ गुरूसह अनेकांनी प्रयत्न केले. परंतु रावणाच्या अहंकारापुढे संपूर्ण प्रयत्न निष्फळ ठरले व सीतेला हस्तगत करण्याच्या जीद्दीने रावणाने आपल्याच संपूर्ण कुळाला युध्दाच्या खाईत लोटले व लंकापती रावण यांच्या सर्वनाशाची आकाशवाणी झाली.हळूहळू संपूर्ण मोठ-मोठे बलाढ्य शुरविर धाराशाही झाले.यात मुख्यत्वेकरून मेघनाथ, कुंभकर्णासारखे महाबलशाली यांनाही रावणाने मृत्यूच्या खाईत लोटले. त्याच प्रवृत्तीचा नाश करण्यासाठीच प्रभुश्रीरामचंद्र हे धरतीवर अवतरले व रावणाच्या वाईट प्रवृत्तीचा रामानी वध केला. विजयादशमी म्हणजे असत्याचारावर सत्याचा विजय, अशुध्दतेवर शुध्दतेचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय,अमानुषतेवर मानवतेचा विजय, निसर्गाचा होत असलेला ह्रास टिकवुन ठेवण्यासाठी वृक्षलागवड करणे हाही विजयच, म्हणजेच आत्म्यातील रावणाचे दहण करुन रामाने सांगितलेला सत्याचा मार्ग अवलंबने हाच खरा सण विजयादशमी होय. राम हे आदर्शपुरुष त्यामुळेच भारताने नेहमी आदर्शाचीच भुमिका जोपासली आहे.तेव्हाच भारतात सर्व धर्म समभाव दिसून येतो. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतित सर्वात महत्वाचा आणि शुभ दिवस म्हणजे “विजयादशमी” साडेतिन मुहुर्तापैकी एक असे या दिवसाला आगळेवेगळे महत्व आहे. घटस्थापनेपासुन तर दस-यापर्यत संपूर्ण भारतात उत्सहाचे,आनंदाचे व मांगल्याचे वातावरण आपल्याला पहायला मिळते व याच दिवसापासुन दिवाळीचा शंखनाद संपूर्ण भारतात गुंजतो. नवरात्र उत्सवामध्ये देवीची ९ दिवस आराधना करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो व दशमीला म्हणजेच विजयादशमीला दसरा उत्सव मोठ्या थाटात भारतभर साजता केला जातो. हा दीवस म्हणजे असुरीशक्तीचा नाश व सत्याचा विजय मानले जाते. दशमीला प्रभुरामचंद्राने रावणाच्या वाईट प्रवृत्तीचा संहार करुण असुरीशक्तीला संपवुन मानवतेचे रक्षण केले. त्या निमित्यानेच विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. याच दीवशी मॉ जगदंबेने अनेक राक्षसाचा वध करुण विजय प्राप्त केला. त्याच प्रमाणे पांडव अज्ञातवासात असतांना पांडवांनी “शम्मीच्या” झाडावर लपविलेली शस्त्रे याच दीवशी काढण्यात आली व याच दीवशी रामाने रावणाच्या वाईट प्रवृत्तीचा वध करुन विजय प्राप्त केल्याच्या अनेक कथांमध्ये व पुराणांमध्ये आपल्याला पहायला मिळते. त्याच अनुशंगाने विजयादशमीला सोण्याच्या(आपट्याच्या)पाणाला तीतकेच अतुट महत्व आहे. सोण्याचे पान एकमेकांना देवुन आनंदोत्सव साजरा करतात व लहान-मोठ्यांना शुभेच्छा व आर्शिवाद देतात. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी सर्वसामान्य व शेतकरी आपल्या उपयोगात येणाऱ्या संपूर्ण शस्त्रांची (साहित्याची)पुजा करतांना फुलांसोबत सोण्याचे पाणांनी पुजा अर्चना केली जाते. यावरुन आपण समजु शकतो कि, सोण्याच्या पाणाला विजयादशमीच्या दिवशी कीती आगळेवेगळे महत्व आहे. देशात वाढते प्रदुषण पहाता विजयादशमीचे औचित्य साधून प्रत्येकांनी वृक्षलागवडीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.कारण प्रत्येक झाडात,फुलात,फळात, मुळात देवीदेवतांचा वास असतोच.त्यामुळे वृक्षलागवडीने देवीदेवतांचे दर्शन अवश्य होईल सोबतच सर्वांना शुध्द हवा, ऑक्सिजन मिळेल व संपूर्ण जीव-जंतुंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.सोबतच गुरांना चारा व सावलीचा आनंद घेता येईल.अशाप्रकारे सर्वत्र उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण वृक्षलागवडीमुळे दिसून येईल. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
( स्वतंत्र पत्रकार )

