ताज्या बातम्या

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी श्रमसंस्कार शिबीर आवश्यक- डाॅ. संजय बैस

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे सावे येथे श्रमसंस्कार शिबिर

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी श्रमसंस्कार शिबीर आवश्यक- डाॅ. संजय बैस

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे सावे येथे श्रमसंस्कार शिबिर

सांगोला : प्रतिनिधी

आजच्या स्थिती पाहिले तर गावेच्या गावे समृद्ध होत आहेत. कोणत्याही गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी ग्रामविकास आराखड्याच्या माध्यमातून विकास आराखडा तयार केला जातो. या आराखड्याच्या माध्यमातून गावाचा विकासाची होत असतो. याशिवाय सामाजिक प्रबोधन व सामाजिक स्वच्छता याची जबाबदारी खुप मोठी असते. प्रत्येक नागरिकांनी सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून सामाजिक स्वच्छता ठेवली पाहिजे. यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय अनेक योजना शासन ग्रामपंचायत माध्यमातून देत असून गावाचा सर्वागिण विकासासाठी स्वच्छता तसेच श्रमसंस्कार शिबिर आवश्यक असल्याचे मत फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डाॅ. संजय बैस यांनी सावे येथील श्रमदान शिबिरात बोलतात व्यक्त केले.
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ग्रामपंचायत सावे (ता. सांगोला) येथे मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी श्रमसंस्कार शिबिर व स्वच्छता जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तृतीय वर्ष बी.फार्मसी मधील एकूण १०२ हून अधिक विद्यार्थ्यांनी या मध्ये सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस, सावे ग्रामपंचायत सरपंच शिवाजी वाघमोडे, उपसरपंच संतोष माने, ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ गायकवाड आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ गायकवाड यांनी ही शिबिरात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले व महाविद्यालयाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
याशिवाय शिबिरामध्ये “श्रम हीच खरी पूजा” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला. स्वच्छता व आरोग्य हीच खरी संपत्ती असून त्यासाठी ग्रामस्तरावर सातत्याने उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना व्यक्त करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश धावरे, क्लब समन्वयक डॉ. सरफराज काझी, वर्ग समन्वयक प्रा. अमोल पोरे, प्रा. स्वाती माने, प्रा. प्रज्ञा गधिरे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button