सुपरफास्ट विशेष

मोठं संकट, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळाच…

मोठं संकट, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळाच…

सांगोला प्रतिनिधी;

राज्यातील हवामानामध्ये  गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहेत. मोठे संकट राज्यावर आहे. उष्णता वाढताना दिसत आहे. सूर्य आग ओकत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा जारी केला.राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. उष्णता अधिक वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 42 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले. यासोबतच राज्यावर दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच काही भागात अवकाळी पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. सोलापूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी, धुळे, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वाशिम, जळगाव, गडचिरोली,सोलापूर  या जिल्ह्यांमध्ये पारा 42 अंशच्या पार गेला. आजही हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. काही भागात पाऊस होण्याचाही अंदाज आहे. पावसाचे संकट एप्रिल महिन्यातही टळताना दिसत नाही. नागरिकांनी उष्णतेचा अलर्ट असताना दुपारी 12 ते 4 दरम्यान घरातून बाहेर पडणे शक्यतो टाळावे.

सांगोला  शहरासह सोलापूर  जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा 42 अंशावर पोहोचल्याने कमालीची उष्णता वाढली. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे तसेच घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, गॉगल यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्यांनी त्वरित  रुग्णालयात उष्माघात  उपचार घ्यावेत असे आवाहन डॉक्टरांकडून आले.उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी तहान नसली तरी वारंवार पाणी प्यावे, ओआरएस, ताक, लिंबूपाणी यांचा वापर करावा. दुपारी ११ ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावे. हलके, सुती कपडे घालावेत आणि डोके झाकूनच बाहेर पडावे. डोकेदुखी, चक्कर, जास्त घाम, अशक्तपणा ही उष्माघाताची लक्षणे असून अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच लहान मुले, वृद्ध आणि प्राण्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button