स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील मोफत डायलिसिस व अत्याधुनिक नवजात बालक युनिट चा लाभ सांगोला तालुक्यातील जनतेने घ्यावा – डॉ बाबासाहेब देशमुख
स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील मोफत डायलिसिस व अत्याधुनिक नवजात बालक युनिट चा लाभ सांगोला तालुक्यातील जनतेने घ्यावा - डॉ बाबासाहेब देशमुख

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील मोफत डायलिसिस व अत्याधुनिक नवजात बालक युनिट चा लाभ सांगोला तालुक्यातील जनतेने घ्यावा -आ .डॉ बाबासाहेब देशमुख
सांगोला प्रतिनिधी
स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वाढेगाव नाका सांगोला येथे अत्याधुनिक डायलिसिस मशीनचे व अत्याधुनिक नवजात बालक युनिटचे उद्घाटन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मा आ.दीपक आबा साळुंखे पाटील व आ.डॉ बाबासाहेब देशमुख यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सेवेमुळे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना स्थानिक पातळीवरच डायलिसिस उपचार उपलब्ध होणार आहेत. सदरचे उपचार हे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत केले जाणार आहेत.तरी या डायलिसिस युनिट मध्ये मोफत व वेळेवर उपचाराची सुविधा उपलब्ध राहणार असून, रुग्णसेवेत स्पंदन हॉस्पिटलने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तरी या डायलिसिस युनिट चा लाभ मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्या रुग्णांनी घावा असे आवाहन आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

मा आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांनी हॉस्पिटल मधील महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार किती केले याचा आढावा घेतला.त्याच बरोबर अत्याधुनिक नवजात बालक युनिट मध्ये कोणकोणते उपचार होणार याचाही आढावा घेतला. या योजनेमध्ये रुग्णाला लाभ घ्यायचा असेल तर काय करावे लागेल? रुग्णाजवळ कागदपत्रांची पूर्तता नसेल तर कश्या पद्धतीने त्यांना मदत करता येईल याचा आढावा घेतला. सध्याच्या जीवन शैलीमुळे मधुमेही रुग्णाची संख्या वाढत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली

या वेळी माहिती देताना डॉ पियूष पाटील व डॉ प्रभाकर माळी यांनी सांगितले की स्पंदन मध्ये गेल्या सव्वा वर्षापासून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना लागू झाली आहे आतापर्यंत जवळजवळ 250 ते 300 गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आतापर्यंत मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया , हाडांच्या शस्त्रक्रिया,फुफुसवरील आजार,विषबाधा, साप चावणे, पॉली ट्रॉमा ,बालरोग इत्यादी रोगावर यशस्वी उपचार करण्यात आले.सांगोला तालुक्यामध्ये किडनी फेल्युर चे प्रमाण लक्षात घेता डायलिसिस ची आवश्यकता वाटल्याने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत डायलिसिस युनिट उभा करणे हे महत्त्वाचे ध्येय होते ते आज पूर्ण झाले.त्याच बरोबर विविध कंपन्यांचे कॅशलेस सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले
या प्रसंगी अध्यक्ष डॉ प्रभाकर माळी,कार्याध्यक्ष डॉ पियूष पाटील,डॉ सचिन गवळी,डॉ अजिंक्य नाष्टे,डॉ शैलेश डोंबे,डॉ सौरभ आजळकर,डॉ सुधीर ढोबळे ,डॉ सुहास ढोबळे,डॉ यशोदिप गायकवाड, डॉ नेहा पाटील,डॉ संगीता पिसे,डॉ मेघना देवकते,डॉ महेश लिगाडे,डॉ गणेश गुरव,डॉ राहुल इंगोले,डॉ रामचंद्र जांगळे,डॉ सैफुन तांबोळी, विनायक लोखंडे,डॉ किरण जगताप,डॉ योगेश बाबर,डॉ वैभव जांगळे,डॉ प्रफुल्ल बाबर,डॉ.रजनी लाटणे,डॉ प्रीती बाबर,रणजीत साळुंखे, अनिरुद्ध मागाडे, विलास सोळंखी,राज घाडगे, विनायक भजनावळे, रोहित कांबळे,आरती उबाळे ,सारिका लिगाडे ,बेबी देवकुळे, प्राजक्ता कसबे , शोभा शिंदे ,सीमा उबाळे, विलास भोईकर, आबासो मोहिते इत्यादी बरोबर हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ व डायलिसिस युनिट चे टेक्निशियन उपस्थित होते.

