सामाजिक

कै . भानुदास बापू देशमुख यांच्या स्मरणार्थ देशमुख कुटुंबियांकडून आपुलकी प्रतिष्ठानला पेशंट बेड भेट 

कै.भानुदास बापू देशमुख यांच्या स्मरणार्थ देशमुख कुटुंबियांकडून आपुलकी प्रतिष्ठानला पेशंट बेड भेट 

सांगोला प्रतिनिधी

सांगोला शहरातील पूर्व भागातील देशमुख वस्ती येथील शेतकरी कुटुंबीय जन्मलेले व आपल्या परिवाराला अतिशय काबाड कष्टातून उन्नतीच्या मार्गावर नेऊन ठेवणारे स्व. भानुदास बापू देशमुख यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सुभाष भानुदास देशमुख व संतोष सुभाष देशमुख या पिता पुत्रांनी आपल्या आजोबा-वडील यांचे चिरस्मृती जतन करण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठानला सर्वसामान्य जनतेमध्ये उपयोगात येणारी वस्तू पेशंटचा बेड आपुलकी प्रतिष्ठानला सप्रेम भेट दिला. त्याचबरोबर आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्याला हातभार लावण्यासाठी 2100 रुपये एवढे रक्कम आपुलकी प्रतिष्ठानच्या मदत निधी मध्ये जमा केली.

यावेळी बोलताना अरुण केदार म्हणाले की आपुलकी प्रतिष्ठानचे कार्य इतक्या जोमाने सुरू आहे की या कार्याला कुठली वेळ अथवा मुहूर्त लागत नाही. जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाप्रमाणे आपुलकी प्रतिष्ठान कार्य करीत आहे. आपण आपल्या वडिलांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठानला मदत केली,याबद्दल देशमुख परिवार यांचा आपुलकी प्रतिष्ठान सदैव ऋणी राहील असे मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना डॉ. वैभव जांगळे व राजेंद्र यादव सर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुभाष देशमुख, संतोष देशमुख, अरूण देशमुख, नितीन देशमुख, दत्तात्रय देशमुख, सतिश देशमुख, ॲड प्रसाद देशमुख, बालाजी देशमुख, निलेश देशमुख, नवनाथ खटकाळे, सचिन कचरे, सुभाष गायकवाड, नामदेव कचरे, पांडुरंग कचरे राजाराम देशमुख, अंकुश देशमुख इत्यादी देशमुख वस्तीवरील नागरिक व आपुलकी प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button