राजकीय

सोलापूर झेडपीचा अध्यक्ष कोण होणार ? जिल्ह्यातील ही नावे आहेत चर्चेत..

चेतनसिंह केदार यांचे नाव आघाडीवर.सांगोला तालुक्याला मिळू शकते संधी..

सोलापूर झेडपीचा अध्यक्ष कोण होणार ? जिल्ह्यातील ही नावे आहेत चर्चेत..

चेतनसिंह केदार यांचे नाव आघाडीवर.सांगोला तालुक्याला मिळू शकते संधी..

सांगोला प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे 68 पैकी 38 जागा मिळवून भाजपने झेडपीवर वर्चस्व राखले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण अशी चर्चा ऐकण्यास मिळते. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या ठिकाणी पुरुष किंवा महिला यापैकी कोणीही अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार, भाजपचे ज्येष्ठ नेते रामप्पा चिवडशेट्टी, बार्शीतील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मदन दराडे यांच्या पत्नी सौ.भारती दराडे यांची नावे सध्या चर्चेत येऊ लागली आहेत.

शांभवी कल्याणशेट्टी या चपळगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. चेतनसिंह केदार हे सांगोला तालुक्यातून चोपडी जिल्हापरिषद गटातून विजयी झाले आहेत. रामप्पा चिवडशेट्टी हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला. तर भारती दराडे या बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. सांगोल्याचे चेतनसिंह केदार हे चोपडी जिल्हापरिषद गटातून मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत.सांगोला तालुक्यातील नगरपालिकेला मिळालेले अपयश भरून काढण्यात ते यशस्वी झाले आहेत त्याच बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे ते विश्वासू आणि जवळचे मानले जातात.

38 जागांपैकी बार्शी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व सहा जागा मिळवत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी यश मिळवले आहे, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सात, मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सहा, मंगळवेढा 4, पंढरपूर 3, माढा 4, दक्षिण विधानसभा 3, माळशिरस 2, करमाळा 2 असे भाजपचे जिल्हा परिषदेमध्ये सदस्य निवडून आले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार राम सातपुते, आमदार सुभाष देशमुख, शहाजी पवार हे नेतेमंडळी एकत्रित चर्चा करूनच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद कोणाच्या गळ्यात घालायचे हे ठरवतील. यामध्ये बार्शी तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकल्यामुळे सौ भारती दराडे, शांभवी कल्याणशेट्टी आणि चेतनसिंह केदार हे अध्यक्षपदाची सर्वाधिक संधी नावे सध्या चर्चेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button