फॅबटेक पाॅलिटेक्निक मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात

सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य तानाजी बुरूंगले यांनी दिली.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात विभाग प्रमुख प्रा. महेश वाळूजकर यांनी प्रास्ताविक करून विभागाचा आढावा उपस्थित पालकांसमोर सादर केला.
यादरम्यान इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्याचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. गणेश शिंदे यांनी केले.