सामाजिक

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला ही शैक्षणिक संस्था आपत्तीजनक परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत सामाजिक बांधिलकी बांधिलकी जपत आली आहे.- संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर

न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महापूर ग्रस्तांना शालेय मदत

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला ही शैक्षणिक संस्था आपत्तीजनक परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत सामाजिक बांधिलकी बांधिलकी जपत आली आहे.- संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर

न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महापूर ग्रस्तांना शालेय मदत

सांगोला प्रतिनिधी

सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीने रौद्ररूप धारण केले नदीकाठावर असलेल्या अनेक गावांना महापुराने वेढले गेले. शेतीचे, घरांचे,जनावरांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य, दप्तर भिजले, वाहून गेले.

या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील राष्ट्रीय सेवा योजना व संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत भैय्या देशमुख यांच्या प्रेरणेने व संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य प्रा.डॉ. अशोकराव शिंदे, प्रा. दीपक कटकाळे,प्रा. जयंत जानकर, प्राचार्य प्रा. केशव माने, उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, पर्यवेक्षक श्री.दशरथ जाधव यांच्या सहकार्याने सांगोला तालुक्यातील जनतेला व न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना आवाहन केले व त्यानुसार भरभरून प्रतिसाद मिळाला.

जमा झालेले शालोपयोगी शैक्षणिक साहित्य मोजे पाकणी ता.उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथील नरसिंह विद्यालय पाकणी, येथील विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलाचे संस्था सचिव मा.विठ्ठलराव शिंदे सर यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले.

त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, यामध्ये सोलापूर जिल्ह्याचाही समावेश असून सीना नदीच्या काठावर वसलेले उत्तर सोलापूर स्थित पाकणी या गावाचे अतोनात नुकसान झाले, यामध्ये शेतीचे, घराचे, जनावरांचे व साहजिकच शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यांचेही नुकसान झालेल्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून पहावयास मिळाल्या.

अशा आपत्तीजनक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये व पुन्हा नव्या उमेदीने शैक्षणिक दिनचर्या सुरू व्हावी, या उद्देशाने जमा केलेले शालोपयोगी साहित्य देण्यासाठी आम्ही सव्वाशे किलोमीटर हुन येथे आलो. स्व. आबासाहेबांच्या प्रेरणेने स्थापन झालेली आमची शैक्षणिक संस्था नेहमीच आपत्ती जनक परिस्थितीमध्ये समाजातील सर्वच घटकांशी सहकार्याची भूमिका दर्शवत असते. या अगोदर सांगली, कोल्हापूर मध्ये कृष्णा नदीच्या महापुरामुळे निर्माण झालेल्या आपत्ती जनक परिस्थितीमध्येही या शैक्षणिक संस्थेने प्रत्यक्ष तिथे जाऊन मदतीचा हात पुढे केला होता. अशाप्रकारे आत्तापर्यंत ही शैक्षणिक संस्था सामाजिक बांधिलकी जपत आली आहे, असे सांगितले.

हे शालोपयोगी साहित्य जमा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. संतोष राजगुरू व स्वयंसेवकांनी अनमोल सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button