प्रभाग क्रमांक 11 च्या अडी अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध – उन्मेष खंडागळे
प्रभाग क्रमांक 11 मधून उन्मेष खंडागळे यांचा अर्ज दाखल

प्रभाग क्रमांक 11 च्या अडी अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध – उन्मेष खंडागळे
प्रभाग क्रमांक 11 मधून उन्मेष खंडागळे यांचा अर्ज दाखल
सांगोला प्रतिनिधी
कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा आज आपल्या सामाजिक कामाच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन करणे ही दुर्मिळ गोष्ट उन्मेष खंडागळे यांनी करून दाखवली आहे.राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना खंडागळे बंधूनी नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास मदत केली. सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून, प्रभागाच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी आजपर्यंत सामाजिक कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांना जन समर्थन मिळत असल्याची भावना येथील तरुणाई व्यक्त होत आहेत. त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलीच कंबर कसली आहे. प्रभाग क्रमांक 11 मधूनजनतेमधून त्यांना आग्रह झाल्यावर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.
सर्वसामान्य जनता आणि सुज्ञ नागरिकांमधून लोकांचे काम करणारा आणि जनतेसाठी कायम उपलब्ध असणाऱ्या नावामध्ये उन्मेष खंडागळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे काही नागरिकांनी बोलताना सांगितले.



