व्यापाऱ्यांचा सन्मान, सुरक्षित बाजार आणि स्मार्ट प्रभाग 4 असा संकल्प घेत विनायक लोखंडे आणि त्यांच्या पत्नी विद्या लोखंडे यांनी अर्ज दाखल केला.
व्यापाऱ्यांचा सन्मान, सुरक्षित बाजार आणि स्मार्ट प्रभाग 4 असा संकल्प घेत विनायक लोखंडे आणि त्यांच्या पत्नी विद्या लोखंडे यांनी अर्ज दाखल केला.

व्यापाऱ्यांचा सन्मान, सुरक्षित बाजार आणि स्मार्ट प्रभाग 4 असा संकल्प घेत विनायक लोखंडे आणि त्यांच्या पत्नी विद्या लोखंडे यांनी अर्ज दाखल केला.
सांगोला, प्रतिनिधी:
सांगोळा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 साठी नगरसेवकपदाचे उमेदवार विनायक लोखंडे व विद्या लोखंडे यांनी आज आपला
“जनसेवेसाठी नवा निर्धार, प्रभाग 4 चा सर्वांगीण विकास हा आपला निर्धार!” असा संकल्प घेतला. व प्रभाग 4 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
श्री विनायक व सौ विद्या लोखंडे यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजा, व्यापाऱ्यांच्या अडचणी, महिला-युवक विकास, शिक्षण-आरोग्य सुविधा आणि पर्यावरण संवर्धन यांना प्राधान्य देत प्रभागासाठी ठोस योजना आमच्या प्रतिनिधी समोर मांडल्या.
त्यांनी प्रत्येक घरा पर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी, गटार आणि पाइपलाइनचे नूतनीकरण, सीमेंट काँक्रीट रस्ते, तसेच LED व सौर दिव्यांच्या स्थापनेद्वारे सुरक्षित प्रकाश व्यवस्था “स्वच्छ प्रभाग – सुंदर सांगोला” या मोहिमेअंतर्गत घरोघरी कचरा संकलन, नाल्यांचे झाकण,महिला बचतगटांसाठी कौशल्यविकास व उद्योजकता प्रशिक्षण, तर युवकांसाठी रोजगार मेळावे आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रभागातील शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, स्वच्छ शौचालये, तसेच ग्रंथालय, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक भवन उभारणीवर भर देण्यात येईल.“झाडे लावा – प्रभाग सुंदर बनवा” या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण, जलसंधारण, आणि झीरो वेस्ट वॉर्ड उपक्रम प्रभागातील सर्व घटकांसाठी समान निधी; वरिष्ठ नागरिक केंद्र व्यावसायिक वर्गासाठी लोखंडे यांनी “व्यवसाय वाढेल, सांगोला उभारी घेईल!” यामध्ये बाजारपेठ स्वच्छता, पार्किंग झोन, हॉकर्स झोन, तसेच CCTV निगराणी, ऑनलाइन परवाना यंत्रणा आणि स्मार्ट कार्ड प्रणाली यांचा समावेश आहे.त्यांनी व्यापारी संघटनांसोबत “व्यापारी सल्लागार मंडळ” स्थापन करण्याचेही आश्वासन दिले, तसेच MSME, बँक कर्ज मार्गदर्शन, विमा योजना आणि व्यापारी गौरव समारंभ यांचा उल्लेख केला. “स्वच्छता, सुरक्षा, शिक्षण आणि रोजगार — या चार आधारस्तंभांवर प्रभाग 4 चा सर्वांगीण विकास घडवू.
व्यापाऱ्यांचा सन्मान, सुरक्षित बाजार आणि स्मार्ट सांगोला – हा आमचा ध्यास आहे!” असे श्री विनायक लोखंडे व विद्या लोखंडे यांनी सांगितले.



