शैक्षणिक
माणदेश महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन
माणदेश महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन

माणदेश महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन
जुनोनी दि. ६ . जुनोनी येथील माणदेश महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महपरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. लोखंडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. लोखंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य किती महान होते, हे सांगितले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवून त्यांनी समतेचा दिलेला लढा जगासाठी वंदनीय आहे. त्यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह व काळाराम मंदिर सत्याग्रह करून देशात नवी क्रांती घडवून आणली.नवभारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून अविस्मरणीय कार्य केले आहे,असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.मुकुंद वलेकर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. उषा कोळवले यांनी केले. आभार प्रा. एल. व्ही. पवार यांनी मानले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. टी. आर. लवटे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व एन. एन. एस. चे स्वयंसेवक उपस्थित होते.



