ताज्या बातम्या
महात्मा गांधी ,लालबहादूर शास्त्री जयंती वामनराव शिंदे साहेब प्रशालेत साजरी.
महात्मा गांधी ,लालबहादूर शास्त्री जयंती वामनराव शिंदे साहेब प्रशालेत साजरी.

महात्मा गांधी ,लालबहादूर शास्त्री जयंती वामनराव शिंदे साहेब प्रशालेत साजरी.
सांगोला (प्रतिनिधी)
सांगोल्यातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रशालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक रमेश पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर एम पवार सर यांनी केले. यावेळी या थोर राष्ट्रपुरुषास जयंतीनिमित्त प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आदरांजली अर्पण केली.