राजकीय

कोण जास्त खर्च करतो या निकषावर उमेदवार निवडून आल्यास शहराचे नुकसान अटळ आहे – डॉ महेश राऊत

कोण जास्त खर्च करतो या निकषावर उमेदवार निवडून आल्यास शहराचे नुकसान अटळ आहे - डॉ महेश राऊत

कोण जास्त खर्च करतो या निकषावर उमेदवार निवडून आल्यास शहराचे नुकसान अटळ आहे – डॉ महेश राऊत

सांगोला प्रतिनिधी
सांगोला नगरपालिका रणधुमाळी सध्या चालू झाली आहे. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रामाणिक सक्षम उमेदवाराला कोणताच पक्ष निवडताना दिसत नाही. त्याऐवजी निवडणुकीसाठी जास्त पैसे कोण खर्च करतो हा निकष लावला जात आहे. त्यामुळे भविष्यात सांगोला शहराचे अतोनात नुकसान होणार आहे.शहराच्या विकासाचे दृष्टिकोन असणारे, सामाजिक भान, असणारे चांगले समाजकार्य करणारे नेते निर्माण होणार नाहीत तर भ्रष्टाचारी पुढील पिढीला वाम मार्गाला लावणारे नेते निर्माण होतील असे मत डॉ महेश राऊत यांनी मांडले.
मित्रानो आपला भाग सनगर गल्ली परिसर विकासापासून कोसो दूर आहे.याला कारण आपली उदासीनता आहे. या भागातील नगरसेवक गेल्या 35 वर्षात झाला नाही. आपल्या गल्लीत भुयारी गटार नाहीत. दुर्गंधी पसरत आहे, कचरा दहा दहा दिवस उचलला जात नाही.याचा विचार केला पाहिजे हीच वेळ आहे म्हणून मी निवडणूक लढवत आहे.
यावेळी शहराच्या विकासाचे मुद्दे नजरे समोर ठेवून प्रभाग क्र 4 मधून निवडणूक लढवणार असल्याचे डॉ महेश राऊत यांनी सांगितले.
शहरातील सार्वजनिक रस्ते निर्माण करणे , उर्वरित भागात भुयारी गटार निर्माण करणे ,स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा करणे ,भावी तरुण पिढीसाठी वाचनालय, क्रीडांगण निर्माण करणे , बालगोपाळासाठी बगीचे निर्माण करणे ,नाना नानी पार्क निर्माण करणे ,शहरात व वाड्यावस्त्यावर विद्युतीकरण करणे या सारखे अनेक कामे करणे व स्वच्छ व पारदर्शक काम करण्यासाठी ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी प्रभागातील मतदारांनी अत्यन्त जागरूकपणे मतदान करावे.कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.जर विकास पाहिजे असेल तर पहिल्यादा मतदारांनी जागरूक झाले पाहिजे.स्वतःला विकले नाही पाहिजे.तरच चांगले लोक नगरपालिकेत जातील व विकास प्रक्रिया राबवतील जर उमेदवार निवडताना पैसे घेऊन किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडून मतदान केले तर तो उमेदवार गेलेले पैसे काढणार हे निश्चित, हे मतदारांनी ओळखून मतदान करावे असे आवाहन डॉ. महेश राऊत यांनी केले
आपण किती दिवस दुसऱ्या च्या मागे पळणार. दारू मटण दिली व मताला पैसे दिले की इकडचे मत मिळते असे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे कुठून ही उमेदवार येऊन उभा राहत आहे.कारण त्यांना वाटत आहे येथील मतदार विकाऊ आहेत त्याना हीच वेळ आहे त्यांची जागा दाखवून द्यायची व आपला स्वाभिमान जागृत करण्याची तुम्ही मला साथ द्या आपल्या प्रभागाच्या विकासाची जबाबदारी माझी. मी वैयक्तिक कोणत्याही स्वार्थ साठी ही निवडणूक लढवत नाही मग जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तुमच्या सोबत कायमच असणारा आपला जिवाभावाचा माणूस हे मी वेगळे सांगायची गरज नाही.असे मत डॉ महेश राऊत यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button